

लोगो PNE26W49951
‘सरफोजीराजे मराठी साहित्य संमेलनात’ सोलापूरचा डंका
तंजावर येथील संमेलनात जिल्ह्यातील चार गुणीजनांना पुरस्कार जाहीर
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : तमिळनाडू येथील ऐतिहासिक तंजावर शहरात बुधवारी (ता. २३) आयोजित करण्यात आलेल्या ‘सरफोजीराजे द्वितीय मराठी साहित्य संमेलनात’ सोलापूर जिल्ह्याने भक्कम मोहोर उमटवली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष शरद गोरे व स्वागताध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे हे दोन्ही सोलापूरकर असून, जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील चार मान्यवर व संस्थांना राज्यस्तरीय मानाच्या पुरस्कारांनी गौरविले जाणार आहे.
तंजावर येथील बृहदेश्वर मंदिराजवळील ‘पेधनन कलैयरंगम हॉल’ येथे हे संमेलन पार पडणार आहे. संमेलनाचे उद्घाटन तंजावर संस्थानचे श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते होणार असून, माजी उच्च शिक्षण मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरद गोरे हे भूषविणार आहेत.
दुपारी ३.३० वाजता निघणाऱ्या ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर उद्घाटन सोहळा, परिसंवाद, पुरस्कार वितरण आणि कविसंमेलन अशा विविध सत्रांनी हे संमेलन रंगणार आहे. तमिळनाडूच्या भूमीत सोलापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक योगदानाचा गौरव होत असल्याने संपूर्ण जिल्ह्यातून आनंद व्यक्त केला जात आहे.
कविसंमेलनात सोलापूरकरांची उपस्थिती
संमेलनात आयोजित राज्यस्तरीय कविसंमेलनात बार्शीच्या सुवर्णा वाघमारे यांची प्रमुख पाहुण्या म्हणून, तर अकलूजचे अप्पा फुले यांची सहभागी कवी म्हणून निवड झाली आहे.
चौकट...
सोलापूर जिल्ह्यातील पुरस्कारार्थी
प्रा. पंडितराव लोहोकरे (बार्शी) : सरफोजीराजे शिक्षणरत्न जीवनगौरव पुरस्कार
प्रार्थना फाउंडेशन (सोलापूर) : सरफोजीराजे समाजरत्न पुरस्कार
रत्नप्रभा पाटील (पंढरपूर) : सरफोजीराजे समाजरत्न पुरस्कार
फुलचंद नागटिळक (माढा) : सरफोजीराजे कलारत्न पुरस्कार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.