Pune News : चेहरा दाखवला तरच मिळणार पगार; झाडणकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियम, महापालिकेने विकसित केले ॲप

झाडणकाम करणारे कर्मचारी गायब असल्याने शहर अस्वच्छ असल्याचे वारंवार दिसून येते. त्यामुळे यास लगाम लावण्यासाठी खास ॲप केले विकसीत.
Sanitation workers

Sanitation workers

esakal
Updated on

पुणे - झाडणकाम करणारे कर्मचारी गायब असल्याने शहर अस्वच्छ असल्याचे वारंवार दिसून येते. त्यामुळे यास लगाम लावण्यासाठी खास ॲप विकसीत केले असून, दिवसातून तीनवेळी हजेरी घेतली जाणार आहे. याची जबाबदार मुकादमावर टाकण्यात आली आहे. मुकादमाच्या मोबाईलमध्ये कर्मचाऱ्याचा चेहरा दिसल्यानंतरच हजेरी लागणार आहे. तसेच ज्या दिवशी चेहरा दिसणार नाही, त्याचा पगारही कापला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com