तळीरामांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची घोषणा...

liquor
liquor
Updated on

भोर (पुणे) : भोर शहर आणि तालुक्‍यातील दारू व मद्यविक्रीची दुकाने बंदच राहणार असल्याचे भोरच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे इन्सीडंन्स कमांडर तथा प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले. 

भोर तालुक्‍यातील नेरे व नसरापूर येथे प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामुळे तालुक्‍यात मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी देण्यात येणार नाही. याशिवाय भोर शहरातील दुकाने बंद राहणार असून, अत्यावश्‍यक सेवेची दुकानेही यापूर्वी ठरल्याप्रमाणे सकाळी 9 ते 12 या वेळेतच उघडी राहणार आहेत.

प्रतिबंधित क्षेत्राचा कालावधी 28 दिवसांचा असून, नेरे येथील कालावधी 11 मे रोजी समाप्त होणार आहे. त्यामुळे भोमधील दुकाने सुरु होणार नाहीत आणि नसरापूर येथील प्रतिबधित क्षेत्राचा कालावधी 31 मेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे भोरमधील नियम शिथील होण्याची चिन्हे दिसत नाहीत. नागरिकांनी लॉकडाउनच्या काळातील नेहमीप्रमाणे नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले. 

पोलिसांकडून बळाचा वापर 
भोर शहरात काही दुकाने सोमवारी (ता. 4) सकाळी उघडल्याने नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली. त्यामुळे शहरातील मंगळवार पेठ व नवी आळी भागाला बाजाराचे स्वरूप आले होते. पोलिसांनी दुपारी बारा वाजता बळाचा वापर करून गर्दी कमी केली. काही बॅंकांच्या एटीएममध्ये पैसे नव्हते. त्यामुळे ग्राहकांनी बॅंकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी केली. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com