सलून व्यवसाय सापडला कात्रीत

गणाधीश प्रभुदेसाई
Friday, 23 October 2020

कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाउनमुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. अनलॉकनंतर नियम व अटींचे पालन करून दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली असली तरी सध्या पूर्वीसारखे ग्राहक येत नसल्याने उत्पन्नात मोठी घट झाली आहे. कुटुंब, घरभाडे, दुकानाचे भाडे, वीजबिल याचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न नाभिक समाजाला सतावत आहे.

पुणे - कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाउनमुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. अनलॉकनंतर नियम व अटींचे पालन करून दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली असली तरी सध्या पूर्वीसारखे ग्राहक येत नसल्याने उत्पन्नात मोठी घट झाली आहे. कुटुंब, घरभाडे, दुकानाचे भाडे, वीजबिल याचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न नाभिक समाजाला सतावत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पुणे जिल्हाध्यक्ष नीलेश पांडे यांनी सांगितले की, पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात मिळून सुमारे १४ हजार दुकाने आहेत व त्यात सुमारे ४५ ते ५० हजार जणांच्या हाताला काम मिळाले आहे. सकाळी दुकान उघडले तरी काही ठिकाणी दुपारी बारापर्यंत ग्राहकाचा पत्ता नसतो. जे येतात ते जास्त करून फक्त केस कापण्यासाठीच येतात. बऱ्याच जणांनी दाढी घरी करायला सुरवात केली आहे. बाकी फेशिअल, फेस मसाज, हेड मसाज या सेवांचा कोणी लाभ घेतच नाहीत. सर्वांत जास्त ग्राहक येत असल्याने रविवार हा नाभिक समाजासाठी ‘उत्सव दिवस’ असायचा. पण सध्या आठवड्याचे सर्व दिवस ग्राहकांची वाट बघण्यातच जातात.

प्रॉपर्टी कार्डला आता कायदाच ठरत आहे अडसर

प्रमुख मागण्या

  • राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे
  • महानगरपालिका व नगरपालिकांनी दुकानांचा कर माफ करावा
  • महावितरणने दुकानांच्या वीजबिलात सवलत द्यावी

या मार्गावर प्रवास करणार असाल, तर दवाखान्यात ॲडमिट नक्कीच होणार

नाभिक समाजातील फक्त ५ ते १० टक्केच नोकरी करतात. बाकी सर्व पारंपरिक व्यवसायावरच पोट भरतात. बऱ्याच जणांनी दुकानेच नाही तर घरेही भाड्याने घेतलेली आहेत. त्यांचे भाडे कसे भरायचे, हा प्रश्‍न आहे. समाजबांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत.
- नीलेश पांडे, पुणे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ

फार कमी ग्राहक आहेत. माझ्याबरोबर सहा सहकारी होते. आता मी आणि आणखी एक असे दोघेच आहोत. जे ग्राहक येतात ते फक्त कटिंग व काही जण दाढी करतात. बाकी कुठल्याच सेवा घेत नाहीत. पूर्वीसारखी कमाई होत नाही.
- अस्लम शेख, कोंढवा, सलूनमधील कर्मचारी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saloon business problem by corona and lockdown