वाळद येथे महापुरुषांना अभिवादन

वाळद येथे महापुरुषांना अभिवादन

चास, ता. ३ : वाळद (ता. खेड) येथे संघमित्रा सामाजिक सेवा संस्था, रमाई महिला मंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने वाळद येथे संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.

भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, आदिवासी आद्य क्रांतिवीर बिरसा मुंडा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई व भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी संयुक्त जयंतीचे नुकतेच वाळद येथे आयोजन केले होते.

यावेळी वाळद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बुद्ध विहाराचे उद्‍घाटन व थायलंड देशातून आणलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थी, महिला यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.

सायंकाळी महापुरुषांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी नंतर झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रथम लोकनियुक्त सरपंच मनोहर पोखरकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कात्रज दूध संघाचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, पुणे जिल्हा शिवसेनाप्रमुख भगवान पोखरकर, संघमित्रा सामाजिक सेवा संस्थेचे प्रथम अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, आरपीआय पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, कल्याणशील देखणे, बिपिन ओव्हाळ, तुकाराम ओव्हाळ, बाळासाहेब कोरडे, वाळदचे माजी उपसरपंच जालिंदर पोखरकर, उद्योजक भरत पोखरकर, रामदास पोखरकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन वाळुंज, दामू लांडगे, अंकुश पोखरकर, मुख्याध्यापक निळकंठ कोरडे, जाकीर इनामदार,
श्रीधर ओव्हाळ, रामदास ओव्हाळ, महादेव शिंदे, सावळेराम ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोखरकर, दादाभाऊ वाळुंज, संतोष पोखरकर, लक्ष्मण पोखरकर आदी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होणेसाठी संयुक्त जयंती समितीचे अध्यक्ष किशोर ओहाळ, सचिव यशवंत ओव्हाळ, गणेश ओहाळ, विलास ओव्हाळ, बाबूराव शिंदे, सचिन ओव्हाळ, कैलास ओव्हाळ, मंगेश शिंदे, अशोक शिंदे, विनोद ओव्हाळ यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद ओव्हाळ यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. लहू पोखरकर यांनी केले. आभार चंद्रकांत शिंदे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com