माळकवठे येथे ''समाधान शिबिरा''तून शासकीय योजनांचा लाभ

माळकवठे येथे ''समाधान शिबिरा''तून शासकीय योजनांचा लाभ

Published on

माळकवठे येथे समाधान शिबिरातून शासकीय योजनांचा लाभ
तहसीलदार बुटे यांचे आवाहन; ३५० नागरिकांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
मंद्रूप, ता. ७ : मौजे माळकवठे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तहसीलदार बुटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शिबिरात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शन करून गरजूंना जागेवरच ११५ दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ३५० पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्या सविता उंबरजे, पंचायत समिती सदस्य, निंबर्गी मंडळातील सर्व सरपंच, माळकवठेच्या सरपंच जयश्री सगरे, नायब तहसीलदार दराडे, मंद्रूपचे मंडळ अधिकारी जोतिबा पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरात कृषी विभागामार्फत ६ ट्रॅक्टर व शेती अवजारांचे वाटप केले. घरकुलासाठी ४० लाभार्थ्यांना मोफत वाळू, ५५ जणांच्या सातबारा दुरुस्तीचे अर्ज निकाली काढले. लाडकी बहीण योजनेअंतर्गत २६५ महिलांचे ई-केवायसी पूर्ण केले. तसेच संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील २१ लाभार्थ्यांच्या प्रलंबित अडचणी सोडवून त्यांना मंजुरी देण्यात आली. पुरवठा विभागाकडे १८० नागरिकांनी नवीन रेशन कार्ड व नाव बदलासाठी अर्ज सादर केले. आरोग्य विभागामार्फत ११७ महिलांची आरोग्य तपासणी केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी राणा वाघमारे, गणेश भुजबळ, तलाठी राजेश विटेकर, निगप्पा कोळी, किरण कोतुले, शिवा दुपारगुडे, पिराप्पा आवटे, राजू बगले, भाऊ गायकवाड, नेहरू कोकरे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तलाठी विश्वनाथ पवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com