समर्थ विद्यार्थी-समर्थ भारत’ या संकल्पनेला उस्फुर्त प्रतिसाद; अभियानात  ५४ हजार शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग

समर्थ विद्यार्थी-समर्थ भारत’ या संकल्पनेला उस्फुर्त प्रतिसाद; अभियानात ५४ हजार शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग

Published on

समर्थ विद्यार्थी-समर्थ भारत संकल्पनेला प्रतिसाद
अभियानात ५४ हजार शिक्षक अन् विद्यार्थ्यांचा सहभाग
............
पंढरपूर, ता. ४ : पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील पाचही जिल्ह्यातील येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी ‘समर्थ विद्यार्थी-समर्थ भारत संकल्प अभियान’ सुरू केले आहे. अभियानात सुमारे ५४ हजार शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
या अभियानाबाबत डॉ. बी. पी. रोंगे यांनी सांगितले की, विकसित भारत २०४७ हे स्वप्न साकारण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि कौशल्ये विकसित करणे काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून ‘समर्थ विद्यार्थी-समर्थ भारत संकल्प अभियान’ सुरू केले आहे.
या संकल्प अभियानाला पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी २०४७ पर्यंत भारताला ‘विकसित राष्ट्र’ बनवण्यासाठी माझे सर्वस्व समर्पित करेन. अशी प्रतिज्ञा घेतली.

कोट
विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती निष्ठा, संविधानाचा सन्मान आणि आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांची जाणीव निर्माण करणे, प्रामाणिकपणा, सहिष्णुता, शिस्त आणि सामाजिक न्याय यांसारखी मानवी मूल्ये विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता आणि तो यशस्वी झाला.
- डॉ. बी. पी. रोंगे, संस्थापक व प्राचार्य, स्वेरी, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com