नागठाणे राज्यस्तरीय यश
समर्थगाव ग्रामपंचायतीस
५० लाखांचा पुरस्कार
माझी वसुंधरा अभियान; ग्रामसेविका बागल यांचा सन्मान
नागठाणे, ता. २२ : शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ या पर्यावरण संवर्धन अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल समर्थगाव (ता. सातारा) येथील ग्रामपंचायतीस ५० लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविले.
मुंबई येथे आयोजित विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समर्थगाव ग्रामपंचायतीस हा पुरस्कार प्रदान झाला. एक जून २०२४ ते ३० मार्च २०२५ या कालावधीत राज्यभर हे अभियान राबविण्यात आले होते. या कालावधीत समर्थगाव ग्रामपंचायतीने पर्यावरण संरक्षणासाठी उल्लेखनीय व प्रभावी काम करून राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली. या स्पर्धेत राज्यातील २७ हजार ८९५ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. या अभियानात सरपंच हिराबाई धारेराव, उपसरपंच रघुनाथ कदम, तत्कालीन ग्रामसेविका जयश्री बागल, सरस्वती ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने वृक्षारोपण, पावसाचे पाणी साठवण, स्वच्छता मोहीम, पर्यावरण जनजागृती आदी उपक्रम प्रभावीपणे राबवले. विशेषतः ग्रामसेविका जयश्री बागल यांनी या अभियानात सक्रिय पुढाकार घेत गावातील प्रत्येक घटकाला सहभागी करून घेतले. ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला बचतगट, शेतकरी व स्वयंसेवी संस्था यांना प्रेरित करून त्यांनी पर्यावरण संरक्षणाच्या उपक्रमांना लोकचळवळीचे स्वरूप दिले. त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे समर्थगाव ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय यश मिळाले असल्याने कौतुक होत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ग्रामसेविका बागल यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांचे पती ग्रामसेवक बिपिन बागल यांच्यासह ग्रामसेवक, ग्रामसेविका, कर्मचारी उपस्थित होते.
B08192
सातारा : जयश्री बागल यांचा सत्कार करताना शिवेंद्रसिंहराजे भोसले.
.......................................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

