

PNE26W29705 सोलापूर ः महसूल उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी.
‘कागदपत्र तपासणीच्या नावाखाली
वाहनधारकांची पिळवणूक थांबवा’
सोलापूर, ता. २५ : वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीच्या नावाखाली नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास उपोषणाचा इशाराही संघटनेने दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनाही ई मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस विस्कळीत होत असून रस्त्यांवरील खड्डे, अनियोजित पार्किंग, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत वाहतूक सुरळीत करण्याऐवजी काही वाहतूक पोलिस कर्मचारी दंडात्मक कारवाईवरच अधिक भर देत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, संपर्कप्रमुख छत्रगुण माने, विक्रम वानकर, जैनुद्दीन नदाफ, विशाल साळुंखे, प्रकाश डोंगरे आदी उपस्थित होते.
कोट
वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याऐवजी काही कर्मचारी दंडात्मक कारवाईवर भर देत आहेत. नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर उपोषण करण्यात येईल.
श्याम कदम, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.