
Pune By-Election : मविआचा पुणे पोटनिवडणूकीचा मार्ग सुकर! शिवसेनेच्या मध्यस्थीला आलं यश
पुणे : पुण्यातील विधानसभा पोटनिवडणूकीवरून राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून तापले आहे. यातच आज निवणूकीतून माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यादरम्यान मविआसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून संभाजी ब्रिगेडने कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही जागांसाठीच्या पोटनिवडणूकीतून माघार घेतली आहे.
पुण्यातील कसबा पेठेत काँग्रेसने उमेदवार दिला आहे, तर चिंचवड येथे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढवत असताना या दोन्ही ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांनी अर्ज भरले होते. संभाजी ब्रिगेडची शिवसेनेशी युती आहे. या पार्श्वभूमिवर शिवसेनेच्या मध्यस्थीनंतर संभाजी ब्रिगेडने मविसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मविआचे नेते सचिन आहिर यांनी संभाडी ब्रिगेडचे नेत्यांची भेट घेतली पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडचे नेते या दोन्ही निवडणूकीतून माघार घेतील. तसेच मविआ उमेदवारांचा प्रचार करतील असा निर्णय संभाजी ब्रिगेडने घेतला आहे. संभाजी ब्रिगेड उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे आणि कसबा पेठे येथूल अविनाश मोहिते तसेच चिंचवडमध्ये प्रवीण कदम हे आघाडीला पाठिंबा देणार आहेत.