राजुरी येथे शूरवीर संभाजी करवर जयंती उत्साहात साजरी

राजुरी येथे शूरवीर संभाजी करवर जयंती उत्साहात साजरी

Published on

SGW26B09173
राजूरी (ता. सांगोला) : येथे शूरवीर संभाजी करवर जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर.

शूरवीर संभाजी करवर यांची
राजुरी येथे जयंती उत्साहात

सांगोला, ता. १६ : सांगोला तालुक्यातील राजुरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शूरवीर संभाजी करवर यांची जयंती ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्याख्याते ज्योतीराम फडतरे यांचे मार्गदर्शन व व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी शूरवीर संभाजी करवर यांच्या शौर्य, निष्ठा व बुद्धिमत्तेचा उल्लेख करताना ते चाणाक्ष, हुशार व मौनव्रत धारण करणारे सर्वगुणसंपन्न योद्धे असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची अंगरक्षक म्हणून निवड केल्याचे सांगितले. सध्याच्या स्पर्धेच्या युगात सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी शूरवीर संभाजी करवर यांचा इतिहास जतन करून एकता, बंधुता व समता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान शूरवीर संभाजी करवर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सुरेश व्हळगळ यांची एमएसएफमध्ये निवड झाल्याबद्दल दिपक दबडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गायकवाड यांनी केले तर दीपक दबडे यांनी आभार केले. यावेळी राजुरी गावातील राजकीय पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com