Laxman Hake : वातावरण कलुषित करण्याचा संभाजीराजेंचा प्रयत्न

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधिस्थळासमोर असणाऱ्या वाघ्या श्वानाच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला.
Laxman Hake
Laxman HakeSakal
Updated on

पुणे - ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधिस्थळासमोर असणाऱ्या वाघ्या श्वानाच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित करून कोल्हापूरचे संभाजीराजे वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

रायगड विकास प्राधिकरणाचे ते अध्यक्ष असून, किल्ले संवर्धनाऐवजी ते नासधूस करण्याची भूमिका घेत आहेत. त्यांच्या या भूमिकेला विरोध आहे. त्यांची प्राधिकरणावरून हकालपट्टी करावी,’ अशी मागणी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत केली.

या वेळी इतिहास अभ्यासक संजय सोनवणी उपस्थित होते. हाके म्हणाले, ‘वाघ्या श्वानाच्या स्मारकावरून संभाजीराजे यांनी ३१ मेपर्यंत मुदत दिली आहे. त्यांनी ३१ मे हीच तारीख का निवडली? या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असते.

यंदा अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात त्यांच्या जन्मगावी पंतप्रधानांना आमंत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी तोच दिवस का निवडला, असा प्रश्न उपस्थित होतो.’

‘संभाजीराजे स्वत:च्या राजकीय हितासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ एका जातीपुरते मर्यादित करण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असेही हाके यांनी सांगितले.

हाके म्हणाले, ‘संभाजीराजे यांनी रायगडावरील वाघ्या श्वानाचे स्मारक हटविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांच्या या भूमिकेला आमचा विरोध आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com