
पुणे : ठरवून दिलेल्या वेळेनंतरही सुरू असलेले पब, पबमधील ‘डीजे’च्या आवाजामुळे त्रस्त झालेले स्थानिक रहिवासी, पार्टीसाठी आलेल्यांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावल्याने होणारी वाहतूक कोंडी आणि पबसह बाहेर सुरू असलेला धिंगाणा... अशी परिस्थिती आजही कोरेगाव पार्क, मुंढवा आणि कल्याणीनगरमधील पब परिसरात आहे.