संपत माने यांचा गौरव

संपत माने यांचा गौरव
Published on

माने यांना उत्कृष्ट सहायक
महसूल अधिकारी पुरस्कार
-------
ॲग्रोवन वृत्तसेवा
लातूर : महसूल दिनानिमित्त चाकूर येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात सन २०२५-२६ या वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत लातूरच्या तहसील कार्यालयातील संपत माने यांना उत्कृष्ट सहायक महसूल अधिकारी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना व जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
सरलेल्या आर्थिक वर्षात सहायक महसूल अधिकारी माने यांनी महसूल विषयक प्रकरणांचा वेळेत निपटारा, कार्यालयीन कामकाजाचे सुयोग्य नियोजन, प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी विशेष मोहीम आदी कामांत विशेष योगदान दिले. त्यासाठी त्यांनी महसूल विभागाच्या ऑनलाईन सेवांचा प्रभावी वापर, डिजिटल माध्यमातून सेवा वितरण, ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी अवलंब, नागरिकांना वेळेत व सुलभ सेवा उपलब्ध करून देणे, तसेच पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. नागरिकांच्या तक्रारींचे संवेदनशीलतेने निराकरण करुन त्यांच्या कामांना प्राधान्य दिले. महसूल प्रशासनातील नावीन्यपूर्ण कामकाज, उत्कृष्ट नियोजन आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कार वितरणप्रसंगी जिल्हाधिकारी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----
फोटो ओळी agnltr_11agust2026_1.jpg लातूर : उत्कृष्ट सहायक महसूल अधिकारी पुरस्कार देऊन संपत माने यांचा सत्कार करताना मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना. याप्रसंगी उपस्थित जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड व अधिकारी.

Marathi News Esakal
www.esakal.com