बारामतीच्या डोक्‍यावर टांगती तलवार, बारा जणांचे नमुने... 

मिलिंद संगई 
Wednesday, 13 May 2020

बारामती तालुक्‍यातील माळेगाव येथील कोरोनाची लागण झालेल्या वायरमनच्या कुटुंबातील 12 जणांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

बारामती (पुणे) : बारामती तालुक्‍यातील माळेगाव येथील कोरोनाची लागण झालेल्या वायरमनच्या कुटुंबातील 12 जणांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांच्या अहवालाच्या प्रतीक्षेत प्रशासन आहे. बारामती पंचक्रोशीतील हा दहावा कोरोना रुग्ण आहे. बारामतीत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून, उर्वरित सर्व रुग्ण बरे झाले आहेत. 

परप्रांतीयांचे आकडे तुमचे मन विचलित करू शकतात... 

संबंधित कोरोनाबाधित वायरमन असून, पुण्यात नोकरीला आहे. त्यांच्या सहकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर माळेगाव येथे आलेल्यांचीही तपासणी झाली. त्यात तेही पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर प्रशासनाने या रुग्णाला शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात असलेल्या पत्नी, दोन मुलांसह इतर नऊ जणांच्या द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बाबत माहिती दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

दरम्यान, बारामतीतील नागरिकांनी व्यवहार सुरू झालेले असले, तरी शारीरिक अंतर पाळणे, मास्क व ग्लोव्हजचा वापर करणे अनिवार्य असल्याचे उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी सांगितले. बारामतीतीलच मेडिकल कॉलेजमध्ये कोव्हिड तपासणी प्रयोगशाळेचे काम वेगाने सुरू आहे. येत्या पंधरवड्यात बारामतीतच ही तपासणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच, रुई येथील कोव्हिड केअर सेंटरच्या उभारणीचेही काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या बाबी झाल्यानंतर तपासणीसाठी पुण्याला जाण्याची गरज भासणार नाही. बारामतीतच कोरोनाची तपासणी शक्‍य होणार आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्व बाबींचा पाठपुरावा करीत आहेत. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samples of 12 members of the corona-infected family in Baramati were sent for testing