

वाळूची माहिती दिल्याच्या
संशयातून चौघांना मारहाण
सांगोला पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. १५ : वाळू वाहतुकीची माहिती तहसीलदारांना दिल्याच्या संशयातून चौघांना दगड, विटा, कोयता व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना वाटंबरे (ता. सांगोला) येथील पुलाखाली घडली. या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दादासाहेब जालिंदर पवार (वय ४०, रा. वाटंबरे) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी (ता. १४) रात्री साडेअकराच्या सुमारास सोलापूर- कोल्हापूर महामार्गावरील वाटंबरे शिवारातील पुलाखाली ही घटना घडली.
या प्रकरणी दत्तात्रय भगवान पवार, दीपक दत्तात्रय पवार, अक्षय दत्तात्रय पवार (सर्व रा. वाटंबरे), यश साळुंखे व एका अनोळखी युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींनी ‘तुम्ही आमच्या वाळूच्या गाड्यांची माहिती तहसीलदारांना दिल्यामुळे आम्हाला दंड झाला,’ असे म्हणत फिर्यादी दादासाहेब पवार, त्यांचा मुलगा विक्रम पवार, भाऊ दिलीप पवार व पुतण्या प्रथमेश पवार यांना शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाणीत दगड, विटा व कोयत्याचा वापर करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच दीपक पवार याने कारमधून तलवारीसारखे हत्यार काढून अंगावर धावून आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात बीएनएस कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बनसोडे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.