पिरंगुटला विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींना चंदनाची उटीचा लेप

पिरंगुटला विठ्ठल-रुक्मिणी 
मूर्तींना चंदनाची उटीचा लेप
Published on

पिरंगुट, ता. २१ : पिरंगुट (ता. मुळशी) येथील पवळे आळीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मूर्तींना चंदन उटीचा लेप लावला आहे. उन्हाळ्यामध्ये दाहकतेपासून संरक्षण मिळावे म्हणून येथील मंदिर व गाभारा आकर्षक फुले, पाने व आंब्यांच्या फळांनी सजविला होता. त्यानिमित्त पहाटे काकडा झाला. त्यानंतर अभिषेक व महापूजा पार पडली. दुपारी चंदन उटी लेप हा विधी झाला. त्यानंतर येथील भैरवनाथ महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. हरिपाठानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. समस्त पिरंगुट पवळे आळी व ग्रामस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. नयन कंधारे यांनी उटीचा लेप लावला. या माजी उपसरपंच राजाभाऊ वाघ, मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुषार पवळे यांची कार्यक्रमाची संकल्पना आणि सजावट होती. या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून दर्शन घेतले.

पिरंगुट ही संत जगमित्र नागा महाराज यांची जन्मभूमी असून श्रीजगमित्रनागा महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन होते. संत जगमित्र नागा महाराजांचा जन्म तत्कालीन मुठा खोऱ्यातील पिरंगुट येथे झाला. संत नामदेव महाराज व संत निवृत्तीनाथ यांच्या गाथेत जगमित्रांच्या नावाचा उल्लेख आढळतो. श्री संत जगमित्र नागा महाराजांची समाधी मराठवाड्यातील श्री क्षेत्र परळी वैजनाथ येथे आहे. संतभूमीमुळे येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरालाही विशेष महत्त्व आहे. या मंदिरात आजही दर एकादशीला कीर्तन आणि भजनाचा तसेच काकडारती आयोजित केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com