बारामतीतील उद्योजक संदीप मेनसे यांचे वयाच्या 51 व्या वर्षी निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

उद्योजक संदीप बबनराव मेनसे (वय 51) यांचे आज पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात आकस्मिक निधन झाले.

बारामती : उद्योजक संदीप बबनराव मेनसे (वय 51) यांचे आज पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात आकस्मिक निधन झाले.

दोन दिवसांपूर्वी त्यांना काविळीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काविळ शरीरात वेगाने पसरल्यामुळे त्यांच्या अवयवांवर त्याचा परिणाम झाला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. बारामती शहरात शून्य भारनियमन करण्यासोबतच महावितरणच्या अनेक प्रकल्पांमध्ये संदीप मेनसे यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

महावितरणचे करोडो रुपये वाचविणारे अनेक प्रकल्प त्यांनी निर्माण केलेले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने बारामती शहरावर शोककळा पसरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandeep Mensey passed away at the age of 51