संदीप मोहोळ खून प्रकरण खटला लांबल्याने पोलिस तपासावर न्यायालयाचे ताशेरे

कुख्यात गुंड सदीप मोहोळचा भरदिवसा निघृणपणे खून करण्यात आला होता. त्यामुळे या गुन्ह्याचा वरिष्ठ पोलिस अधिका-यामार्फत तपास करणे आवश्‍यक होते.
Court
CourtSakal

पुणे - कुख्यात गुंड सदीप मोहोळचा (Sandip Mohol) भरदिवसा निघृणपणे खून (Murder) करण्यात आला होता. त्यामुळे या गुन्ह्याचा वरिष्ठ पोलिस अधिका-यामार्फत तपास (Inquiry) करणे आवश्‍यक होते. गुन्हा (Crime) दाखल करून घेण्यास उशीर करणे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब वेळेत रेकॉर्ड न करणे, ओळख परेड घेतल्यानंतर साक्षीदारांचे जबाब न नोंदवणे अशा त्रुटी तपासात असल्याचे ताशेरे न्यायालयाने (Court) तपास यंत्रणेवर ओढले आहेत. (Sandeep Mohol Murder Case Pending Court Warning Police Investigation Crime)

मोहोळ खून प्रकरणात मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी गुरुवारी (ता. २२) तिघांना जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास केला आहे. १४ वर्षे ३ महिने १८ दिवसांनी या खटल्याचा निकाल लागला आहे. टोळी युद्धातून झालेल्या या गुन्ह्यात १८ जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्यात एकूण ७६ साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यात पोलिस आयुक्त, तपास अधिकारी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, डॉक्टर यांचा समावेश आहे. अटक झाल्यानंतर यातील अनेक आरोपी साडेसात वर्षे कारागृहात होते. खटला लांबल्याने आरोपींना २०१४ मध्ये जामीन मंजूर करण्यात आला होता. तत्कालीन जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी या खटल्यात गेल्या वर्षी अंतिम युक्तिवाद केला. त्यानंतर कोरोनामुळे खटल्याची सुनावणी रेंगाळली होती.

Court
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ थांबविण्यासाठी समिती स्थापन न केल्यास दंड

निकालात नमूद असलेले चौकशीतील दोष :

- गुन्हा दाखल करून घेण्यास उशीर केला

- प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब वेळेत रेकॉर्ड केले नाहीत

- ओळख परेड घेतल्यानंतर साक्षीदारांचे जबाब नोंदविले नाहीत

- आरोपींनी ओळख परेड दरम्यान साक्षीदाराला दिलेली धमकी रेकॉर्डवर नाही

- मोहोळचे रक्त उडालेल्या तीन साक्षीदारांचे कपडे जप्त करण्यात आले नाहीत

- गणेश मारणेच्या घरातून पिस्तूल जप्त करतानाचे तोंडी व कागदोपत्री पुरावे नाहीत

- घटनेच्या ठिकाणी सापडलेल्या दुचाकी व हत्यारांवर कोणाच्या हाताचे ठसे आहेत याचा काही पुरावा नाही

- सीडीआर व मोबार्इल लोकेशनसारखे इलेक्ट्रॉनिक पुरावे मांडण्यात आले नाहीत

- आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या मालकीबाबतचे कागदपत्र सादर केले नाहीत

- या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिरा-यांने करणे आवश्‍यक होते.

या मुद्यांवर सुनावली शिक्षा :

मोहोळ याची गाडी सिग्नलवर थांबली होती तेव्हा त्यावर हल्ला करण्यात आला. काही आरोपींनी गाडीच्या काचा फोडल्या व तर सचिन पोटे याने गोळीबार केला. मोहोळचा खून करने हाच आरोपींचा हेतू होता. तसेच नियोजित कट करून खून करण्यात आला आहे. या सर्व बाबी न्यायालयासमोर मांडलेल्या साक्षी- पुराव्याद्वारे शाबीत झाल्या आहेत. हे पुरावे शिक्षा सुनावण्यासाठी पुरेसे असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com