पिंपरनेच्या सात बचत गटांची यशोगाथा; आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक बांधिलकीही जपली

पिंपरनेच्या सात बचत गटांची यशोगाथा; आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक बांधिलकीही जपली
Published on: 

GHR26A09640
संगमनेर ः पिंपरने( ता.संगमनेर) येथे बचत गटांच्या वतीने आयोजित दिवाळी साहित्य वाटप कार्यक्रमात उपस्थित महिला व पुरुष सभासद.

आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक बांधिलकीही जपली

पिंपरनेच्या सात बचत गटांची यशोगाथा; १ कोटी ८५ लाखांची वार्षिक उलाढाल

संगमनेर, ता. २ : आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि विश्वासाच्या बळावर पिंपरने (ता. संगमनेर) येथील सात बचत गटांनी सामूहिक विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. वर्षभरातील आर्थिक व्यवहारातून मिळालेल्या नफ्यातून सभासदांना किराणा साहित्य आणि रोख लाभांशाचे वाटप करून त्यांनी यंदाची दिवाळी गोड केली. या सातही बचत गटांची एकत्रित वार्षिक उलाढाल एक कोटी ८५ लाख रुपये, तर निव्वळ नफा १४ लाख ५० हजार रुपये झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

युनिटी कृषी, विघ्नहर्ता महिला, सह्याद्री कृषी, राजमाता महिला, हिमालय कृषी, सखी महिला आणि एव्हरेस्ट कृषी या बचत गटांच्या वतीने दिवाळीनिमित्त लाभांश आणि किराणा साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विघ्नहर्ता महिला बचत गटाने सभासदांना पाच किलो साखर आणि पाच लिटर तेलाचे वाटप केले. युनिटी कृषी बचत गटाने प्रत्येकी १५ हजार रुपये रोख लाभांश, ५० किलो साखर आणि १५ लिटर तेलाचे वाटप केले. राजमाता महिला बचत गटाने ५० किलो साखर, १५ लिटर तेल, दोन किलो तूप आणि दोन किलो हरभरा डाळ दिली. सह्याद्री कृषी आणि हिमालय कृषी बचत गटांनी प्रत्येकी ५० किलो साखर व १५ लिटर तेलाचे वाटप केले. सखी महिला बचत गटाने १५ किलो साखर व १५ लिटर तेल, तर एव्हरेस्ट कृषी बचत गटाने प्रत्येक सभासदाला १५ लिटर तेलाचा डबा भेट दिला.

कार्यक्रमास सुमारे ६० महिला आणि ८० पुरुष सभासदांसह ग्रामस्थ उपस्थित होते. बचत गटांच्या माध्यमातून गावात सकाळ व्यायाम गटाची स्थापना करण्यात आली. या गटाच्या पुढाकारातून राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले. तसेच गावातील सुशिक्षित आणि नोकरदार तरुणांनी पुढाकार घेऊन ‘अग्निपंख अभ्यासिका’ सुरू केली.
.............
बचत गट विकासाचे आधारस्तंभ!

हैदराबाद, रामोजी फिल्म सिटी, कळसूबाई, रतनगड, रायगड आणि विश्रामगड अशा विविध ऐतिहासिक व पर्यटनस्थळांच्या सहलींचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यंदा उज्जैन तसेच अयोध्येतील राममंदिर दर्शनासाठी विमानाने सहलीचे नियोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.