संरक्षण विभागाची सुरक्षा भिंत कोसळली
पिंपळे गुरव, ता. ५ ः सांगवी फाटा येथील बाबूरावजी घोलप महाविद्यालय बस थांब्याशेजारील संरक्षण विभागाची जुनी सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना घडली. भिंतीचा मोठा भाग थेट पदपथ व रस्त्यावर पडल्याने पादचारी तसेच वाहनचालकांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दोन दिवसांपूर्वी संरक्षण विभागाच्या जागेभोवती उभारण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीचा काही भाग अचानक थेट पदपथावर पसरला. या मार्गावर शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि स्थानिक नागरिकांची दिवसभर मोठी वर्दळ असते. त्यातच बस थांब्यालगतच ही घटना घडल्याने प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे.
या ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग तसेच औंधकडे जाणारा मार्ग आणि रक्षक चौकाकडून येणारा मार्ग अशा चार दिशांमधून वाहतूक एकत्र येत असल्याने वाहतूक आधीच मोठ्या प्रमाणात असते.
संरक्षण दलाच्या सुरक्षा भिंतीचा काही भाग पदपथावर पडला आहे. संरक्षण विभागाशी संपर्क साधून तुटलेल्या भिंतीमुळे पदपथावर पडलेला राडारोडा तातडीने उचलून घेण्यास सांगितले जाईल.
- सतीश वाघमारे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय
सांगवी फाट्याकडे जाण्यासाठी नागरिकांना याच मार्गाने जावे लागते. मात्र, पदपथ व रस्त्यावर पडलेल्या भिंतीच्या राडारोडा आणि काटेरी तारेमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्वरीत राडारोडा हटवून भिंतीची दुरुस्ती करावी.
- देविदास राजपूत, स्थानिक नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

