

सांगली जिल्हा बँक
निवडणुकीचे बिगुल वाजले
१ नोव्हेंबरला मतदान; ३ नोव्हेंबरला मतमोजणी; आज उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंगळवारी (ता. २२) जाहीर केला. गुरुवारपासून (ता. २४) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, १ नोव्हेंबरला मतदान, तर ३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच सहकारातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी सर्वपक्षीय पॅनेलविरुद्ध भाजप अशी संभाव्य लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी ११ सप्टेंबरला प्रसिद्ध झाली होती. विकास सेवा संस्थांसह शेती, पाणीपुरवठा, खरेदी-विक्री संघ, नागरी बँका व पतसंस्था, औद्योगिक प्रक्रिया आणि औद्योगिक मजूर संस्थांसह एकूण २ हजार ४४५ मतदारांचा समावेश आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा सहकार उपनिबंधक सुनील चव्हाण यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणूक जाहीर झाल्याने बँकेची आचारसंहिताही लागू झाली आहे.
२४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ५ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. ६ ते २० ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. २१ ऑक्टोबरला निवडणूक चिन्हांचे वाटप होणार असून, १ नोव्हेंबरला मतदान आणि ३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. दरम्यान, बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गट आणि भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या, गटांची जुळवाजुळव आणि जागावाटप यावरून राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.