

सांगली जिल्ह्यात हलका पाऊस
ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, मंगळवारी (ता. २३) रात्री सर्वदूर हलका पाऊस झाला. तर शिराळ्यात मध्यम पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६.१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कधी ढगाळ. तर कधी ऊन असे वातावरण आहे. मंगळवारी रात्री जिल्ह्यातील विविध भागांत हलका व मध्यम पाऊस झाला. शिराळा तालुक्यात गेल्या २४ तासांत २९.१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात धूळ वाफेवर भाताची पेरणी झाली आहे. या पिकासाठी हा पाऊस काहीसा उपयुक्त ठरणार आहे. दुष्काळी भागातील जत ०.१ मिलिमीटर आणि कवठेमहांकाळ ०.५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात बुधवार(ता. २४) सकाळपासून पावसाने उघडीत दिली आहे. दिवसभर कधी ढगाळ तर कधी ऊन असे वातावरण आहे. जिल्ह्यात दिवसांपैकी सहाच दिवस पाऊस झाला असून आज अखेर ७३.२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. शेतकरी अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षेत आहे. या पावसामुळे आगाप टोकणी झालेल्या सोयाबीन, भात यासह इतर पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे.
----------
गेल्या २४ तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस (मिलिमीटर)
मिरज: ३.२, जत:०.१, खानापूर : ४.३, वाळवा:७.७, शिराळा: २९.१, आडपाडी : २.६, कवठे महांकाळ : ०.५, पलूस: ४.५, कडेगांव:४.६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.