सांगली : त्रिभाजनाबाबत उपनिबंधकांचा पुढील आठवड्यात निर्णय

सांगली : त्रिभाजनाबाबत उपनिबंधकांचा पुढील आठवड्यात निर्णय
Published on

त्रिभाजनाबाबत उपनिबंधकांचा
पुढील आठवड्यात निर्णय

ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः सांगली बाजार समिती त्रिभाजनाबाबत बाजार समिती प्रशासन, संचालकांचे अभिप्राय मागितल्यानंतर जिल्हा सहकार उपनिबंधक सुनील चव्हाण कोल्हापूर सर्कीट बॅंचकडे शुक्रवारी (ता. ११) आणखी एक आठवड्याची मुदत मागितली आहे. विभाजनाबाबत पुढील आठवड्यातच निर्णय अपेक्षित आहे.
सांगली बाजार समितीचे त्रिभाजन करावे, असा अहवाल पणन विभागाने जिल्हा उपनिबंधकांकडे दिला होता. त्यानंतर संचालक मंडळ व बाजार समिती प्रशासनाकडून पुन्हा अभिप्राय मागविण्यात आले. सर्व संचालक, बाजार समिती प्रशासनाने अभिप्राय जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केले आहेत. अभिप्राय दाखल करण्याची अंतिम मुदत गुरुवारी (ता. १०) होती. जिल्हा सहकार उपनिबंधक चव्हाण यांच्या निर्णयाकडे लक्ष होते. मात्र त्यांनी मुदतवाढ मागितली आहे.
राज्य सरकारने सांगली बाजार समितीचे त्रिभाजन करून जत व कवठेमहांकाळ येथे स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला संचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर भागधारक व मतदारांचे म्हणणे जाणून घेण्यात आहे. त्यानंतर झालेल्या वार्षिक सभेत त्रिभाजन करू नये, असा ठराव करण्यात आला. हा ठराव जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com