माझा प्रभाग, माझे व्हिजन – सांगोला
लोगो : सांगोला नगरपरिषद
---
SGW26B09373
प्रभागातील सर्व भागांचा समतोल विकास करणार
सांगोला : शहरातील प्रभाग क्रमांक पाच हा विविध सामाजिक स्तरातील नागरिकांचा प्रभाग आहे. या प्रभागातील इंदिरानगर, पुजारवाडीचा काही भाग तसेच नवीन वसाहत परिसर आजही मूलभूत सुविधांपासून काही प्रमाणात वंचित आहेत. या सर्व भागांचा समतोल आणि सर्वांगीण विकास करणे हेच माझे प्रमुख व्हीजन आहे. अहिल्यानगर व इतर परिसरातही दर्जेदार रस्ते, स्वच्छता, पाण्याची निचरा व्यवस्था, पथदिवे आणि सुरक्षित सार्वजनिक जागा उपलब्ध करून देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन. नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी रस्त्यांच्या गुणवत्तेवर विशेष भर देण्यात येईल. आवश्यक त्या ठिकाणी काँक्रिटीकरण, दुरुस्ती आणि गटार व्यवस्थेचे मजबुतीकरण करण्यात येईल. ज्या भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होतो किंवा अनियमित आहे, त्या ठिकाणी तांत्रिक उपाययोजना राबवून नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाईल. नवीन जलवाहिन्या, दुरुस्ती व आवश्यक पंपिंग व्यवस्थेसाठी पाठपुरावा करण्यात येईल. झोपडपट्टी व वंचित वस्त्यांमध्ये वीज, स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे प्राधान्य राहील. प्रत्येक कुटुंबाला मूलभूत सुविधा मिळाल्याशिवाय प्रभागाचा खरा विकास होऊ शकत नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे. हा आदर्श प्रभाग म्हणून उभा करण्याचा माझा निर्धार आहे.
- काशिलिंग गावडे, नगरसेवक, सांगोला नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

