

सांगोल्यात १९ हजारांचा
प्रतिबंधित पानमसाला जप्त
‘अन्न व औषध’ची कारवाई; तिघांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. १५ : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा १९ हजार ६३४ रुपये किमतीचा साठा अन्न व औषध प्रशासनाने सांगोल्यात जप्त केला. एखतपूर रस्त्यावरील बनकर वस्ती येथील सिद्धनाथ व्हरायटीज या दुकानात गुरुवारी (ता. १५) दुपारी केलेल्या तपासणीत हा साठा आढळला. या प्रकरणी दुकान मालकासह दोन कथित पुरवठादारांविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. पंचांच्या उपस्थितीत दुकानाची तपासणी केली असता, प्रतिबंधित सुगंधित मावा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळले.
या कारवाईत सुगंधित माव्याचे ५० पुडे, डायरेक्टर पान मसाल्याचे सात, विमल पान मसाल्याचे लहान आठ व मोठे तीन, चैनी सुगंधित तंबाखूचे ५१, सुपर पान मसाल्याचे १०, तुलसी रॉयल जाफरानी जर्द्याचे २०, आरएमडी पान मसाल्याचे दोन, एम सुगंधित तंबाखूचे दोन, रजनीगंधा पान मसाल्याचा एक, सुपर ९९ तंबाखूचे १०, शॉट प्रीमियम सुगंधित तंबाखूचे १०, व्ही-१ तंबाखू किंग पॅकचे १० आणि व्ही-१ तंबाखूचे आठ पुडे जप्त करण्यात आले. या साठ्याची एकूण किंमत १९ हजार ६३४ रुपये आहे.
जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी वेगळे ठेवण्यात आले असून, उर्वरित साठा पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रथमेश श्रीकांत जाधव (वय २४, रा. बनकर वस्ती, सांगोला), विजय कलढोणे (रा. आटपाडी, जि. सांगली) आणि सैफ तांबोळी (रा. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.