

MHD26B05020
सांगोला : येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब मुलांना व त्यांच्या कुटुंबीयांना यात्रेची सफर घडविताना आपुलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते.
.........
झोपडपट्टीतील गरीब मुलांना यात्रेची सफर
.......
आपुलकी प्रतिष्ठानचा पुढाकार; मुलांच्या चेहऱ्यावर आनंद
...........
महूद, ता. १ : गावची यात्रा म्हणजे विविध प्रकारचे पाळणे, खेळणी आणि चटकदार अल्पोपाहार. लहान मुलांसाठी अशी यात्रा म्हणजे आनंदाची पर्वणीच. झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि दारिद्र्याशी सातत्याने संघर्ष करणाऱ्या झोपडपट्टीतील मुलांना हा आनंद दुरापास्तच. मात्र सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना सांगोल्याच्या यात्रेची सफर घडवून त्यांचा एक दिवस तरी आनंदाने भरून टाकला.
सांगोला येथील अंबिका देवीची यात्रा सुरू आहे. या यात्रेचे नियोजन कोर्ट रिसिव्हर मार्फत केले जाते. यावर्षी सांगोला शहरातील मिरज रोडलगत असलेल्या लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील गरीब मुले व त्यांच्या पालकांना यात्रेत बोलावून मोठा पाळणा, जहाज आदी विविध खेळण्यांमध्ये त्यांना बसवून यात्रेचा आनंद देण्यात आला. त्याचबरोबर सांगोला यात्रेत सर्वांच्या पसंतीस उतरणारी जिलेबी व भजी देऊन यात्रेचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
यात्रेतील पाळण्यात बसल्यानंतर या गोरगरीब मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व काही सांगून जाणारा असा होता. पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर भटकंती करून मिळेल त्यात समाधान मानणारी ही भटकी कुटुंबे आपल्या प्रपंचाचा गाडा ओढताना होणारी दमछाक कोणाला सांगणार अशा परिस्थितीत यात्रेचा आनंद मुलांना मिळणे तसे दुर्मिळच. याचा विचार करुनच आपुलकी प्रतिष्ठान या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेने गेल्यावर्षीपासून अशा गरीब मुलांना यात्रेची सफर घडवून आणण्याचा एक आनंददायी उपक्रम सुरु केला आहे.
यावेळी आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, वसंत माने, महादेव दिवटे, अरविंद डोंबे, अतुल वाघमोडे आदींसह कोर्ट रिसिव्हर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.