माझा प्रभाग, माझे व्हिजन - सांगोला

माझा प्रभाग, माझे व्हिजन - सांगोला

Published on

माझा प्रभाग माझे व्हीजन
सांगोला नगरपालिका

SGW26B09327

स्वच्छ अन् निरोगी परिसरासाठी ठोस उपाय
प्रभाग क्रमांक ४ चा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हेच माझे मुख्य ध्येय आहे. सध्या प्रभागात मूलभूत सुविधांवर विशेष भर देत असून, काही ठिकाणी अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे नियमित व कायमस्वरूपी स्वच्छता व्यवस्था उभारून स्वच्छ, निरोगी आणि सुरक्षित परिसर निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलणार आहे. कचरा व्यवस्थापन, नाल्यांची स्वच्छता आणि जनजागृती यावर भर देण्यात येईल.
विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज डिजिटल अभ्यासिका स्थापन करण्याचा माझा मानस आहे, जेणेकरून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यासाचे वातावरण उपलब्ध होईल. तसेच लहान मुलांसाठी छोटेखानी बगीचा, नागरिकांसाठी सुसज्ज जिम आणि व्यायामाची साधने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी योग्य जागेचा पर्याय शोधला जात आहे. नियमित आणि उच्चदाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना राबविण्यात येतील. पाणी साठवण, वितरण व्यवस्थेतील सुधारणा आणि गळती रोखणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना विश्रांतीसाठी ठिकठिकाणी बसण्याची सोय, सावलीची व्यवस्था आणि सुरक्षित परिसर निर्माण करण्याचा मानस आहे. माझा प्रभाग हा स्वच्छ, सुसंस्कृत, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आणि आरोग्यदायी व्हावा, नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढावा आणि सर्व घटकांना न्याय देणारा विकास व्हावा, हेच माझे स्पष्ट व्हीजन आहे.
- ज्ञानेश्वर तेली, नगरसेवक, सांगोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com