विद्यापीठाच्या अर्थशास्त्र परिषदेकडून सांगोला महाविद्यालयाचा सन्मान

विद्यापीठाच्या अर्थशास्त्र परिषदेकडून सांगोला महाविद्यालयाचा सन्मान
Published on

MHD26B05093
सांगोला : महाविद्यालयाचा विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेकडून सन्मान झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांचा सत्कार करताना महाविद्यालयातील प्राध्यापक.

विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेतर्फे
सांगोला महाविद्यालयाचा सन्मान
..........
महूद, ता. ६ : सांगोला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग विविध प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवीत असल्याबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र परिषदेकडून सांगोला महाविद्यालयास नुकतेच सन्मानित करण्यात आले.
वडाळा येथील माऊली महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची १८ वी अर्थशास्त्र परिषद नुकतीच संपन्न झाली. या अर्थशास्त्र परिषदेत सांगोला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा.डॉ. संतोष कदम, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड, सचिव प्रा. डॉ. अमोल खाडे आणि परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
महाविद्यालयाचा सन्मान झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांचा डॉ. टी. आर. माने व आयक्यूएसी प्रमुख डॉ. आर. जी. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com