सांगोला महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ

सांगोला महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ

Published on

MHD26B05076
सांगोला : महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन करताना प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व इतर मान्यवर.
---
सांगोला महाविद्यालयात क्रीडा महोत्सवास प्रारंभ
महूद : सांगोला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांचे उद्‌घाटन नुकतेच प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास क्रीडाशिक्षक प्रा. जगदीश चेडे तसेच क्रीडा समिती सदस्य डॉ. मालोजी जगताप, डॉ. अमोल पवार, प्रा. वासुदेव वलेकर, प्रा. विधीन कांबळे, प्रा. प्रसाद लोखंडे, प्रा. विजय यादव, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. सोनल भुंजे आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. भोसले यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांमधील सहभागाचे महत्त्व पटवून दिले. यंदाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये व्हॉलिबॉल, खो-खो, बुद्धिबळ, कबड्डी, बॅडमिंटन, रस्सीखेच तसेच ॲथलेटिक्स अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग असून महाविद्यालयाच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com