माझा वार्ड, माझे व्हिजन :  सांगोला

माझा वार्ड, माझे व्हिजन : सांगोला

Published on

SGW26B09407
प्रभाग सर्व सुविधासंपन्न करण्याचा संकल्प

सांगोला : शहरातील माझा प्रभाग हा सांगोला शहरातील सर्वात सुविधा-संपन्न व आदर्श प्रभाग बनविण्याचा माझा संकल्प आहे. प्रभागातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. विजेचे खांब, रस्ते प्रकाशयोजना तसेच स्वच्छता या मूलभूत गरजांबरोबरच सर्व रस्ते मजबूत व काँक्रीटीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. वस्त्यांमध्ये नियमित स्वच्छता मोहीम राबवून सांडपाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी गटारी व ड्रेनेज व्यवस्थेची सुधारणा करण्यात येईल. परिसरात लहान मुलांसाठी खेळाचे मैदान तसेच उद्यान उभारण्याकडेही लक्ष दिले जाईल. प्रभागातील इतर समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नागरिकांनी कोणतीही समस्या असल्यास थेट संपर्क साधावा. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्नशील राहीन. येणाऱ्या काळात नागरिकांच्या मूलभूत सुविधांसह इतर सर्व सुविधा मी देण्याचा प्रयत्न करणार असून कोणतीही समस्या शिल्लक राहणार नाही असे काम करुन दाखवेन.
- गणेश बनकर, नगरसेवक, सांगोला नगरपरिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com