

चारा अनुदानासह ११६ टीएमसी
पाण्यासाठी सांगोल्यात उपोषण
ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगोला, जि. सोलापूर : दुष्काळग्रस्त भागांना हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी आणि शेतकरी व पशुपालकांना थेट आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी सांगोला तहसील कार्यालयासमोर गुरुवारपासून (ता. २९) ‘महाराष्ट्र दुष्काळमुक्ती उपोषण’ सुरू केले आहे. शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास सोमवारी (ता. २) सांगोला तहसील कार्यालय बंद पाडून तेथे जनावरे आणून बांधण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी जय जवान माजी सैनिक संघटनेने शहरातून रॅली काढून पाठिंबा दर्शवला, तर सांगोला बार असोसिएशन, प्रहार संघटना, युवक काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यासह विविध संघटनांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. उपोषणस्थळी श्री शंभू महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. शेळकेवाडी-शिवणे येथील धुळदेव गजी-ढोल मंडळाने पारंपरिक कला सादर करत, तर भजनी मंडळांनी टाळ-मृदंगाच्या गजरात भजनसेवा सादर करून आंदोलनाला पाठिंबा दिला. या धार्मिक व सांस्कृतिक सादरीकरणामुळे उपोषणस्थळाचे वातावरण भारावून गेले होते.
चौकट ----
आंदोलनातील प्रमुख मागण्या
- टाटा-कोयना प्रकल्पातून समुद्राला वाहून जाणारे ११६ टीएमसी पाणी उजनी, नीरा कालवा, टेंभू, म्हैसाळ, जिहे-कठापूर आणि उरमोडी प्रकल्पांद्वारे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळी भागांत सोडावे.
- उत्तर कोकणातील अतिरिक्त २४९ टीएमसी पाणी समांतर जलवाहिनी व बोगद्यांद्वारे उर्वरित महाराष्ट्र व दक्षिण भारताला देण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी.
- चारा छावण्यांऐवजी पशुपालकांच्या खात्यावर मोठ्या जनावरांसाठी दररोज १५० रुपये आणि लहान जनावरांसाठी १०० रुपये थेट अनुदान वर्ग करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.