सांगोल्यात दोन पत्रकारांवर वेगवेगळ्या घटनांत प्राणघातक हल्ला

सांगोल्यात दोन पत्रकारांवर वेगवेगळ्या घटनांत प्राणघातक हल्ला
Published on

सांगोल्यात दोन पत्रकारांवर वेगवेगळ्या घटनांत प्राणघातक हल्ला

एकावर लोखंडी रॉड, काठी, चैन, तलवार, कोयत्याने हल्ला; दुसऱ्यावर पाईप-काठीने प्राणघातक वार

सांगोला, ता. १० : सांगोला तालुक्यात एकाच दिवशी दोन पत्रकारांवर वेगवेगळ्या घटनांत बेदम मारहाण करण्यात आल्याने पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या आहेत.
पहिल्या घटनेत पत्रकार किशोर कृष्णा म्हमाने (वय ३०) हे ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास दुचाकीवरून कडलास नाक्यावरून मिरज रोडने जात होते. त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाची युनिकॉर्न दुचाकी आली. त्यावर संतोष सुखदेव लवटे याच्यासह दोन अनोळखी व्यक्ती होते. ‘बंडू मासाळ यांना विरोधक का करतोस?’ असे म्हणत त्यांनी म्हमाने यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आणखी दहा ते पंधरा जण दुचाकींवरून तेथे आले. निखिल जानकर याने लोखंडी रॉडने म्हमाने यांच्या डोक्यात, सागर मोटे याने काठीने डोक्यावर, तर बबन जानकर याने लोखंडी चैनने पाठीवर मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशाल जानकर याने तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला; मात्र तलवार बाजूच्या भिंतीला लागली. धनंजय पवार याच्याकडे कोयता होता. धीरज काटे, अरमान शेख, दीपक वगैरे, कृष्णा व्हरे आदींनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विष्णू देशमुख व अस्मीर तांबोळी यांनी घटनास्थळी येऊन भांडण सोडविल्यानंतर हल्लेखोर दुचाकींवरून निघून गेले. जखमी म्हमाने यांच्यावर सांगोल्यातील मोहन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यापूर्वी सुभाष सुरवसे व बंडू मासाळ यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

एखतपूरजवळ दुसऱ्या पत्रकारावर हल्ला
दुसऱ्या घटनेत पत्रकार बबन किसन चव्हाण (वय ३०, रा. लोटेवाडी) यांना ९ सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास एखतपूर येथील खडी क्रशरजवळ तीन अनोळखी व्यक्तींनी अडवून मारहाण केली. चव्हाण हे सांगोल्याहून लोटेवाडीकडे जात असताना तिघांनी त्यांची दुचाकी अडवली. काहीही न विचारता काठी व लोखंडी पाईपने त्यांच्या डाव्या पायावर, दोन्ही हातांवर, डोक्यात तसेच उजव्या डोळ्यावर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मागून येणारे शंकर भगवान सरगर घटनास्थळी येताच तिघेही दुचाकीवरून सांगोल्याच्या दिशेने निघून गेले. जखमी चव्हाण यांना प्रथम आटपाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सांगोला येथील खासगी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन्ही घटनांतील हल्लेखोरांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com