''डॉक्टर्स डे'' निमित्त सांगोल्यात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

''डॉक्टर्स डे'' निमित्त सांगोल्यात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
Published on

‘डॉक्टर्स डे’निमित्त सांगोल्यात मॅरेथॉन

सांगोला : राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त सांगोला डॉक्टर्स असोसिएशन व सूर्योदय परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलै रोजी ‘सांगोला मॅरेथॉन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्याबाबत जनजागृती, फिटनेसचा प्रसार आणि युवकांमध्ये स्वयंशिस्त व सातत्याची प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन धावपटू व वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर अंकित गर्ग यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्पर्धेत १० किलोमीटर खुला गट, ५ किलोमीटर पुरुष गट आणि ५ किलोमीटर महिला गट अशा तीन प्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना रोख पारितोषिके व आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com