मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याची वसुलीची बॅग केली लंपास
मायक्रो फायनान्सच्या
कर्मचाऱ्याची बॅग लंपास
दुचाकीवरून आलेल्या चोरट्याविरुद्ध गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. ३ : मेडशिंगी- सांगोला मार्गावर भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याची रोकड व मोबाईल असलेली बॅग चोरून नेल्याची घटना मंगळवारी (ता. २) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. याबाबत सांगोला पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत भिवाजी कोळी (वय २४, रा. सौंदणे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) हे ‘क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड’ या मायक्रो फायनान्स कंपनीत नोकरीस आहेत. मंगळवारी त्यांनी मेडशिंगी परिसरात वसुली करून सुमारे ३४ हजार ८०६ रुपये रोकड रक्कम जमा केली होती. तसेच त्यांच्या बॅगेत अंदाजे २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल होता. असा एकूण ५९ हजार ८०६ रुपयांचा मुद्देमाल होता.
दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून सांगोल्याकडे परत येत असताना मेडशिंगी गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर त्यांची दुचाकी अचानक बंद पडली. त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून बॅग पेट्रोल टाकीवर ठेवली व इंजिन तपासत असताना मेडशिंगीकडून आलेल्या दुचाकीवरील अज्ञात व्यक्तीने क्षणात बॅग उचलून पळ काढला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी बाकीटोळ तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

