सांगोला तालुक्यात टपाली मतदान ७४ टक्के
SGW२६B०९२३८
सांगोला : येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात टपाली मतदानासाठी आलेले अधिकारी व कर्मचारी.
सांगोला तालुक्यात ७४ टक्के टपाली मतदान
सांगोला, ता. १ : सांगोला तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (ता. १) टपाली मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ७ तर पंचायत समितीसाठी १४ जागांसाठी ७४ टक्के टपाली मतदान झाले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे टपाली मतदान घेण्यात आले.
टपाली मतदारांची एकूण संख्या ५८५ असून, मतदानासाठी ७ स्वतंत्र कंपार्टमेंटची व्यवस्था करण्यात आली होती. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळपासून रांगा लावून उत्स्फूर्तपणे मतदान केले. सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. यामध्ये एकूण ४३७ कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला असून, टपाली मतदानाची टक्केवारी ७४ टक्के असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी दिली.
मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. टपाली मतदानासाठी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी केले होते. टपाली मतदान केंद्राचे नोडल अधिकारी दीपाली जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले आदी उपस्थित होते, अशी माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी दिली.
मंगळवेढ्यात ४२ टक्के मतदान
मंगळवेढा ः जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी टपालाद्वारे ५५० पैकी २३६ मतदाराने मतदान केल्याने ४२.९० टक्के मतदान झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मदत जाधव यांनी दिले. सुविधा केंद्रामधून ज्यांनी अद्याप टपाली मतदान केलेले नाही, अशा मतदारांकरिता पुन्हा ३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७ पर्यंत सुविधा केंद्र तहसील कार्यालयात चालू ठेवण्यात येणार आहे. २ फेब्रुवारी रोजी टपाली मतदानाचे सुविधा केंद्र चालू नसल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी मदन जाधव यांनी दिले. झालेले मतदान ः गटासाठी दामाजी नगर ६६ टक्के, हुलजंती ६१, लक्ष्मीदहिवडी ४९ तर भोसे ६० टक्के. गणासाठी दामाजी नगर ३१ टक्के, बोराळे ३५, हुलजंती १७, मरवडे ४४, चोखामेळा नगर २७, लक्ष्मी दहिवडी २२, भोसे १४, रड्डे ४६ टक्के.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

