सांगोला विद्यामंदिर प्रशालेस जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचा आदर्श शाळा पुरस्कार
MHD26B05082
सांगोला : येथील विद्यामंदिर प्रशालेची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र स्वीकारताना संस्था कर्मचारी.
.......
सांगोला विद्यामंदिरास
आदर्श शाळा पुरस्कार
..........
महूद : जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या आदर्श शाळा पुरस्कारासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशालेची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या रविवारी (ता. १) करमाळा येथील राजयोग हॉलमध्ये होणाऱ्या तेराव्या राज्यस्तरीय विज्ञान अधिवेशनामध्ये करण्यात येणार आहे.
सांगोला विद्यामंदिर प्रशालेत विज्ञान विषयाच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेले सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांना विज्ञान व प्रज्ञा परीक्षेसाठीचे प्रयत्न, विज्ञान प्रदर्शन, विज्ञान प्रकल्प, विज्ञान प्रश्नमंजूषा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षकांचे मार्गदर्शन या सर्व बाबींचा विचार करून सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ॲड. विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, शीला झपके, विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य, प्राचार्य अमोल गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे आदींचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

