सांगोला येथे १ फेब्रुवारीला मतदान सुविधा केंद्र सुरू; टपाली मतदान कक्षात ८०८ मतदारांची नोंद
सांगोला येथे रविवारी
मतदान सुविधा केंद्र सुरू
टपाली मतदान कक्षात ८०८ मतदारांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. २९ : सांगोला येथे रविवारी (१ फेब्रुवारी) मतदान सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर) सुरू करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह (टाऊन हॉल) येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे केंद्र कार्यरत राहणार असल्याची माहिती टपाली मतदान नोडल अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी दिली.
तालुक्यात निवडणूक कर्तव्यावर असलेले व सांगोला तालुक्यातील मतदार असणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी केले आहे. टपाली मतदान कार्यक्रमाचे नियोजन पूर्ण झाले असून, सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. तालुक्यातील एकूण ६५२ मतदार, तालुक्याबाहेरील ७१ तर जिल्ह्याबाहेरील ८५ मतदारांची टपाल शाखेत नोंद झाली असून, एकूण ८०८ मतदारांची नोंद टपाली मतदान कक्षात करण्यात आली आहे.
या कक्षामध्ये सहायक नोडल अधिकारी गणेश तिखे, वर्षा डोंबाळे, माधुरी घाडगे, प्रगती माळी, सोफिया पठाण, आदिती पाटील, कोमल दौंड, स्नेहल पाटील, मयूरी साळुंखे, अनुप्रिया शेलार, अपर्णा मोरे, अश्विनी कांबळे, वंदना गुप्ता, अमोगसिद्ध कोळी, हमजू मुलाणी, दिलावर बागवान, रोहित वसवडे आदी कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत (पंचायत समिती, सांगोला) यांनी दिली. दरम्यान, १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या मतदान प्रक्रियेवेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावेत, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

