माझा प्रभाग, माझे व्हिजन : सांगोला
SGW26B09371
मूलभूत सुविधा लवकरच देण्यास प्राधान्य
सांगोला : माझा प्रभाग क्रमांक एक हा विविध वस्त्यांनी समृद्ध आणि वेगाने विकसित होणारा भाग आहे. या प्रभागात वाड्या-वस्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्यामुळे मूलभूत सुविधांची गरज अधिक आहे. नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेऊन सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार आहे. सर्वप्रथम, प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत नियमित आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा पोचवणे ही माझी प्राथमिकता आहे. काही भागात पाण्याचा कमी दाब आणि अनियमित पुरवठा ही समस्या आहे. विशेषतः चिंचोली रोड व एखतपूर रोड परिसरातील नागरिकांसाठी प्रत्येकी पाच लाख लिटर क्षमतेच्या नव्याने दोन पाण्याच्या टाक्यांसाठी मी पाठपुरावा करणार आहे. काही वस्त्यांमध्ये रस्त्यांबाबत अडचणी आहेत. शेतकरी व नागरिकांचा समन्वय साधून त्या अडचणी दूर करून दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते करणार आहे. वीज व्यवस्था सक्षम करणे, नियमित पाणीपुरवठा, भक्कम रस्ते आणि सुसज्ज पायाभूत सुविधा यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.
- रामचंद्र मदने, नगरसेवक, सांगोला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

