संग्रामनगर गट

संग्रामनगर गट

Published on

लोगो ः संग्रामनगर जि. प. गटात

इनकमिंगचा भाजपला
अपेक्षित फायदा नाही

दुरंगी लढतीत राष्ट्रवादीच्या सुषमा नारनवर विजयी

शशिकांत कडबाने ः सकाळ वृत्तसेवा
अकलूज, ता. १२ : संग्रामनगर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप यांच्यात लढत झाली. या गटात मोहिते पाटलांचे प्रथमपासून वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीच्या सुषमा नारनवर या निवडून आल्या. तर संग्रामनगर गणातून निशा गिरमे व मेडद गणातून युवराज झंजे विजयी झाले. ऐन निवडणुकीच्या काळात या गटातील काहीजणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु त्याचा अपेक्षित परिणाम झाला नसल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय या पक्षांनी एकत्र येत उमेदवार दिल्याने संग्रामनगर गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आला होता. हा गट नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव होता. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुषमा नारनवर तर भाजपकडून मेघा कचरे यांच्यात दुरंगी सामना झाला. या गटात पहिल्यापासून मोहिते पाटील यांचे वर्चस्व राहिले असून मित्र पक्षांनेही सहकार्य केले. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी प्रचार सभा घेतल्या. भाजपच्या उमेदवार मेघा कचरे यांनीही कॉर्नर सभा, पदयात्रा व मतदारसंघातील प्रत्येक घरी पोचत प्रचार केला. राष्ट्रीय काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रकाश पाटील यांचे पानीव हे गाव या मतदारसंघात येते. त्यांनी पदयात्रा व सभा घेतल्या. त्यांना पानिवकरांनी साथ दिली. तसेच एन निवडणुकीच्या काळात काहीजणांनी भाजप प्रवेश केला. परंतु त्याचा परिणाम अपेक्षेएवढा झाला नाही. मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुषमा नाननवर यांना निवडून दिले.
संग्रामनगर गटातील मेडद गण हा सर्वसाधारण असून या गणात भाजपचे नाथा पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवराज झंजे यांच्यात लढत झाली. दोघांनीही घरोघर प्रचार करीत मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले. मात्र मतदारांशी थेट संपर्क व मोहिते पाटील यांचे वर्चस्व असल्याने या गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवराज झंजे यांचा विजय झाला.

चौकट...
संग्रामनगर गणात माने-पाटलांचा पराभव
संग्रामनगर गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या निशा गिरमे आणि भाजपच्या राजेश्वरी माने पाटील यांच्यात लढत झाली‌. या गणातून निशा गिरमे आधीही मोहिते पाटील यांच्या गटाकडून निवडून आल्या होत्या. त्यांनी मोहिते पाटील कुटुंबातील सदस्यांबरोबर मतदारसंघात घरोघरी भेट देऊन प्रचार केला. त्या संग्रामनगरच्याच रहिवासी असल्याने संग्रामनगर, आनंदनगर परिसरातील घराघरांत त्यांचा चांगला संपर्क आहे. या जोरावर त्यांनी माने-पाटील कुटुंबातील राजेश्वरी माने पाटील यांचा पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com