श्रमिकांच्‍या यशस्‍वी मुलांचा सत्‍कार

श्रमिकांच्‍या यशस्‍वी मुलांचा सत्‍कार
Published on

जिद्दीच्‍या जोरावर सनिल निकम यांचे यश

शाहूपुरी विद्यालयात सत्कार; पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी

सातारा, ता. ११ : खडतर परिस्‍थितीशी झुंज देत येणाऱ्या संकटांवर मात करत शिक्षण पूर्ण करत ज्ञानाच्‍या बळावर पोलिस दलात कार्यरत झालेल्‍या सनिल निकम या माजी विद्यार्थ्‍याचा नुकताच शाहूपुरी माध्‍यमिक विद्यालयात सत्‍कार करण्‍यात आला.
आंबेदरे येथील निकमवाडीमधील सनिल निकम हे रहिवासी. वडील लहानपणीच वारलेले. जेमतेम पावसाळी शेती. आई, तीन बहिणी आणि सनिल असे कुटुंब, परिस्‍थितीही बिकट. अशा परिस्‍थितीत शाहूपुरी माध्‍यमिक विद्यालयातून सनिल यांनी शिक्षण पूर्ण करत परिस्‍थिती बदलण्‍याचा चंग बांधला. अपयशाला मागे टाकत त्‍यांनी पोलिस दलात नोकरी मिळवली. नोकरीच्‍या माध्‍यमातून आलेल्‍या आर्थिक स्‍थिरतेतून त्‍यांनी सर्व कुटुंब सावरले. नोकरी करत असतानाच सनिल यांनी खात्‍यांतर्गत परीक्षा देत नुकतीच उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. अशा या माजी विद्यार्थ्यांच्या सत्‍काराचे आयोजन शाहूपुरी माध्‍यमिक विद्यालयात करण्‍यात आले होते. यावेळी सनिल निकम यांचा भारत भोसले यांनी सत्‍कार केला.
यावेळी शालाप्रमुख पी. के. दीक्षित, एस. एम. बारंगळे, एम. आर. जाधव, ए. व्ही. भोसले, पी. एम. साळुंखे, जी. जे. देसाई, चंद्रकांत देशमुख, डी. डी. कुचेकर, पी. ए. भोसले आदी उपस्‍थित होते.
हलाखीच्या परिस्थितीवर मात करत सनिल यांना मिळवलेले हे यश हे नवपिढीस प्रेरक असल्याचे प्रतिपादन भारत भोसले यांनी यावेळी केले. सनिल निकम यांनी यशात विद्यालयाचा मोठा हातभार असल्‍याचे सांगत पदाचा वापर उपयोग समाजातील गोरगरीब घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी करेन असा विश्वास दिला.
यावेळी विद्यार्थी साहिल पवार, श्रेयस सुतार, नील शिंदे, ऋद्र शिंदे, आयुष भुवड, स्नेहा शिंदे यांनी स्पर्धा परीक्षांतून आयुष्य घडविण्याचा मनोदय व्यक्त केला.
..........
17551
शाहुपुरी : सनिल निकम यांचा सत्‍कार करताना भारत भोसले. शेजारी इतर शिक्षक व विद्यार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com