
पुणे : ‘‘पालखी सोहळ्यामध्ये स्वच्छता आणि महिलांच्या आरोग्यावर भर देण्यात आला आहे. वारीत महिला वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत राज्य महिला आयोगाने सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन आणि इन्सिनरेशन यंत्रे उपलब्ध करून देण्याचा घेतलेला पुढाकार हा स्तुत्य असून, वारीतील स्वच्छतेला राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे,’’ असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.