सकाळ सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने सिंहगडावर स्वच्छता मोहीम ; पंचवीस पोती कचरा संकलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanitation campaign Sinhagad fort initiated Sakal Social Foundation garbage collection
सकाळ सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने सिंहगडावर स्वच्छता मोहीम ; पंचवीस पोती कचरा संकलन

सकाळ सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने सिंहगडावर स्वच्छता मोहीम ; पंचवीस पोती कचरा संकलन

किरकटवाडी : सकाळ सोशल फाउंडेशन , केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स , यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क व सह्याद्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता व जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती. या स्वच्छता मोहिमेत पुण्यातील अनेक महाविद्यालयांतील विविध विद्याशाखेत शिक्षण घेत असलेले सुमारे सत्तर विद्यार्थी स्वयंसेवक सहभागी झाले होते.

सिंहगडावरील गाडीतळापासून छत्रपती शिवाजी महाराज व नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या जयघोषाने स्वच्छता मोहीमेला सुरुवात झाली. चार तास चाललेल्या या स्वच्छता मोहिमेत गडावरील तब्बल पंचवीस पोती कचरा गोळा करण्यात आला. यामध्ये प्लास्टिक बॉटल, रिकामे प्लास्टिक फूड पॅकेट्स, काचेच्या बॉटल व इतर कचऱ्याचे संकलन करण्यात आले.गडावर स्वच्छता मोहीम राबवत असताना व कचऱ्याचे संकलन करत असताना आलेल्या दुर्गप्रेमी व पर्यटकांशी स्वयंसेवकांनी संवाद साधून स्वच्छतेबाबत जनजागृती व प्रबोधन केले.

स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्वयंसेवकास आयोजकांच्या वतीने टी-शर्ट, टोपी, सुरक्षिततेसाठी हातमोजे व इतर साहित्य देण्यात आले होते. स्वच्छता मोहीमेच्या शेवटी सर्व सहभागी स्वयंसेवकांनी गडावर स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या उपक्रमासाठी वन विभाग व पुरातत्व विभागाचेही सहकार्य लाभले.

Web Title: Sanitation Campaign Sinhagad Fort Initiated Sakal Social Foundation Garbage Collection Student Volunteers Participated

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top