ओतूरच्या संजय देशमुख यांची 
एमडीआरटी सन्मानासाठी निवड

ओतूरच्या संजय देशमुख यांची एमडीआरटी सन्मानासाठी निवड

Published on

ओतूर, ता. ३ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील आयुर्विमा सल्लागार संजय देशमुख यांची एमडीआरटी या विमा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानासाठी सलग सात वेळा निवड झाली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून (एलआयसी) पुणे विभागातील २०२७ वर्षाचा हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला. हा पुरस्कार मिळविणारे देशमुख हे एलआयसीच्या पुणे विभागातील पहिले विमा प्रतिनिधी आहेत. या पुरस्कारासाठी विमा सल्लागाराला १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या वेळेत उच्च प्रीमियम विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागते. देशमुख यांनी हे उद्दिष्ट २५ फेब्रुवारी पर्यंतच (५६ दिवसातच) पूर्ण केले. यामुळे अमेरिकेत २०२७ मध्ये होणाऱ्या जागतिक विमा परिषदेला त्यांना उपस्थित राहता येणार आहे. या सन्मानाबद्दल मार्गदर्शक डी. डी. डोके, किशोर साळवे, योगीराज गेडाम यांनी देशमुख यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com