
Usha Kakade News: माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. उषा काकडे असं त्यांचं नाव आहे. उषा यांनी जास्तीच्या झोपेच्या गोळ्या घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. त्यांना तातडीने रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. कौटुंबिक कारणातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.