मंत्री गिरीष महाजन माध्यम संवाद

मंत्री गिरीष महाजन माध्यम संवाद

Published on

संजय राऊतांचे वक्तव्य विकृतीतूनच
महाजनांचा उलटवार : शिवसेनेच्या (यूबीटी) ऱ्हास याचाच परिणाम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत कुठलाही घातपात नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले असताना, शिवसेना (युबीटी) चे खासदार संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य विकृत मानसिकतेतून आलेले असून ते अशोभनीय आहे, असा घणाघाती उलटवार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केला.
अजित पवार यांच्याकडे भाजपच्या भ्रष्टाचाराचे पुरावे होते, त्यामुळे ते ‘स्वगृही’ येण्याच्या तयारीत होते आणि त्यांचा विमान अपघात हा ‘ऑपरेशन लोटस’चा भाग असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. या आरोपांचा समाचार घेताना महाजन म्हणाले, ‘संजय राऊत हे विकृत विचारांचे माणूस आहेत. त्यांच्या अशाच विकृतीमुळे शिवसेना (युबीटी)वर दुर्दैवी स्थिती ओढवली आहे. राज्यातील एकाही महापालिकेत शिवसेनेचा (युबीटी) महापौर होऊ शकलेला नाही.’
‘उरलासुरला पक्ष वाचवायचा असेल, तर उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्यासारख्या ‘बोलबच्चन’ नेत्यांना बाजूला सारले पाहिजे,’ असा सल्लाही महाजन यांनी दिला. दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या तांत्रिक बिघाडाबाबतही महाजन यांनी स्पष्टीकरण दिले. ‘या घटनेतही कुठलाही घातपात किंवा कटाचा प्रकार नाही,’ असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com