अवसरी खुर्द येथे धार्मिक कार्यक्रम
मंचर, ता. ६ : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे संकष्टी चतुर्थी तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मयुरेश्वर मंदिर येथे झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमाला भोरवाडी, वायाळ मळा, कराळेवाडी, शिंदे मळा, खडक वस्ती तसेच गावठाणातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मयूर गणेश मंडळातर्फे सकाळी महाअभिषेक, पूजा व आरतीचा कार्यक्रम पार पडला. गणेशभक्तांनी मयूरेश्वराच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. पुरोहित महेश चिंचोलीकर यांच्या मंत्रोच्चारात महाअभिषेक विधी पार पडला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. कार्यक्रमानंतर भाविकांना खिचडीचे वाटप केले. यावेळी शिवजयंतीनिमित्त मयूर गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष हरिदास रामवत व मंडळाचे अध्यक्ष मनोज काळ दंते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भजनाचा कार्यक्रमही झाला.
याप्रसंगी महाअभिषेक व आरतीचे मानकरी चंद्रकांत शिंदे, श्यामराव शिंदे, महादेव गावडे, सुरज रामवत, आशिष शिंदे, बाळासाहेब गायकवाड, शैलेश भालेराव, शांताराम भालेराव, दीपक टेंभेकर, रावजी बांगर हे होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

