संस्कृतच्या शिक्षणाचे नवे दालन होणार खुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanskrit language

प्राचीन भाषा असलेल्या संस्कृत भाषेविषयी अनेकांना आकर्षण असले, तरी क्लिष्टतेच्या भितीने या भाषेचे शिक्षण घेणे टाळले जाते.

संस्कृतच्या शिक्षणाचे नवे दालन होणार खुले

पुणे - प्राचीन भाषा असलेल्या संस्कृत भाषेविषयी अनेकांना आकर्षण असले, तरी क्लिष्टतेच्या भितीने या भाषेचे शिक्षण घेणे टाळले जाते. मात्र ही भिती दूर करून सोप्या-सहज पद्धतीने संस्कृत शिकवण्यासाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने पुढाकार घेतला आहे. येत्या जूनपासून संस्कृत भाषेच्या ऑनलाइन कोर्सची सुरूवात करण्यात येणार आहे.

भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन आणि वसंत कोठारी फाऊंडेशनचे राज कोठारी व अशोक कोठारी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. एकूण १२० चित्रफितींचा समावेश असलेला हा कोर्स सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध असणार आहे. ‘आपली मातृभाषा शिकताना आपण दैनंदिन व्यवहारातील भाषा आधी शिकतो आणि त्यानंतर त्या भाषेचे व्याकरण शिकतो. हीच पद्धत या कोर्समध्ये वापरण्यात येणार आहे. संस्कृत भाषेची अवाजवी भीती घालवणे हाही या वर्गाचा उद्देश आहे. यासाठी संस्थेच्या www.borilib.com या संकेतस्थळाला भेट द्यावी’, असे पटवर्धन यांनी सांगितले.

‘या कोर्ससाठी वसंत कोठारी फाऊंडेशनने अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. संस्कृत भाषेचा प्रसार आणि प्रचार सर्वदूर व्हावा, यासाठी वसंत कोठारी फाऊंडेशन विविध संस्थांना मिळून पाच कोटी रुपये देणगी स्वरूपात देणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये भांडारकर संस्थेला या प्रकल्पासाठी पन्नास लाख रुपयांची देणगी देण्यात येणार आहे’, असे राज कोठारी यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, विश्वस्त प्रदीप रावत, प्रदीप आपटे, डॉ. श्रीनंद बापट आदी उपस्थित होते.

Web Title: Sanskrit Education Will Be Opened

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top