Pune News : संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळाची लवकरच स्थापना- मुख्यमंत्री शिंदे

सुतार समाजाच्या मेळाव्यात घोषणा
sant bhojling kaka economic development corporation set up says cm eknath shinde
sant bhojling kaka economic development corporation set up says cm eknath shindeEsakal

आळंदी : सुतार समाजाच्या उन्नतीसाठी संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून यासाठी ५० कोटी रुपयांचे निधी तातडीने मंजूर केला जाईल. असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

विश्वकर्मा सुतार समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा आळंदी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समाज महामेळाव्यात सहभागी बांधवांसोबत संवाद साधला . यावेळी ते बोलत होते.

आमदार महेश लांडगे,आमदार डॉ. संजय रायमुलकर (मेहकर), शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे,विश्वकर्मीय सुतार समाजाचे मुख्य प्रशासकीय राज्य समन्वयक प्रा. विद्यानंद मानकर,पी. जी सुतार,राज्य समन्वयक दिलीप अकोटकर,

हनुमंत पांचाळ,रवींद्र सुतार,प्रदीप जानवे,आनंद मिस्त्री,विजय रायमूलकर,भगवान राऊत, संजय बोराडे, नारायण क्षीरसागर, गणपत गायकवाड,अरुण सुतार, अर्जुन सुतार,विलास भालेराव,नारायण भागवत, शिवाजी सुतार,विवेकानंद सुतार,ज्ञानेश्वर सुतार, मधुकर सुतार, बाळासाहेब सुतार,दत्ता सुतार,भगवान श्राद्धे, प्रकाश बापर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले कि, सुतार समाजाच्या १३ मागण्यांपैकी महामंडळ स्थापनेची घोषणा आजच करीत करतो तर उर्वरीत १२ मागण्यांसाठी एक स्वतंत्र बैठक घेवून सकारात्मक निर्णय दिला जाईल,असे संकेत मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

यावेळी प्रा.विद्यानंद मानकर म्हणाले कि, सुतार समाजाच्या उत्थानासाठी संत भोजलिंग आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, यासाठी किमान ५० कोटींची तरतूद करावी, केंद्रीय आर्टिझन शिष्यवृत्ती योजना पाल्यांना विनाअट

लागू करावी, पिढ्यान्पिढ्या कलेच्या माध्यमातून सुतार समाजाने विविध ऐतिहासिक किल्ले - महाल-वास्तू तथा शिल्पे निर्माण केलेली आहेत. या ऐतिहासिक वास्तूंद्वारे सरकारकडे जो महसूल जमा होतो, त्यातून किमान २५ टक्के वाटा पारंपरिक कारागिरांना द्यावा, अशी मागणी यांनी केली.

आमदार श्री.लांडगे म्हणाले कि,सुतार समाजाने विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेचा लाभ घेऊन स्वतःला सक्षम करावे. दुर्लक्षित राहिलेल्या शांतता प्रिय सुतार समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार.असे आश्वासन दिले.

यावेळी आमदार रायमूलकर म्हणाले कि,सामाजिक समस्या सोडविण्यासाठी समाजाने एकत्रित आले पाहिजेत तरच आमच्यासारखे नेते झुकतात. सुतार समाजाच्या व्यवसायावर इतरांनी अतिक्रमण केल्याने बऱ्याच ग्रामीण नागरीकांचे हाल सुरू आहे.शासनाकडून आपल्या समाजाच्या जास्तीत जास्त मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्याचा माझा प्रयत्न राहील. असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनील धनगर यांनी केले. तर आभार गणपत गायकवाड यांनी मानले. या महामेळाव्यास राज्यातील सुमारे साडे आठ नागरिक आले होते.

मेळाव्याच्या उदघाटनपूर्वी हभप संतोष ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदीतून बाल वारकऱ्यांसह संत भोजलिंग काका प्रासादिक दिंडी काढण्यात आली. ज्ञानेश्वर माऊली देवस्थान ट्रस्टला २ किलो चांदीच्या पादुका अर्पण केल्याबद्दल दत्तात्रय सुतार(इचलकरंजी) यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com