आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर पायी वारीतील मानाचे अश्व प्रस्थान वारीसाठी रविवारी (ता. ८ जून) अंकली येथील शितोळे सरकार यांच्या वाड्यातून निघणार आहेत. अंकली ते आळंदी हा सुमारे ३१५ किलोमीटरचा प्रवास करत मानाचे अश्व बुधवारी (ता. १८ जूनला) प्रस्थानाच्या एक दिवस आधी आळंदीमध्ये पोहोचणार आहेत.